आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Kajol Birthday Special: Life Facts And Photos

B'day: 40 वर्षांची झाली अजय देवगणची पत्नी, पाहा काजोलचे Personal Life फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: अभिनेत्री काजोल अजय देवगण आणि मुलगी न्यासासह
आपल्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवणारी काजोल आज (5 ऑगस्ट 1947) 40वा वाढदिवस साजरा करत आहे. शालेय जीवनातच तिला पहिला ब्रेक मिळाला. तिने जरी बालकलाकाराच्या रुपात करिअरला सुरुवात केली असली तरी ती आज ज्या शिखरावर आहे ते तिच्या कष्टाने.
साधी सिंपल दिसणा-या काजोलचा जन्म बंगाली-मराठी कुटुंबात झाला. तिचे वडील शोमू मुखर्जी सिनेमा दिग्दर्शक आणि निर्माते होते. तसेच, तिची आई तनुजा प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री होत्या. काजोलला तनिषा ही धाकटी बहीणदेखील आहे.
सुरुवातीचा काळ
काजोलचे सुरुवातीचे शिक्षण पंचगनीच्या सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कुलमध्ये झाले. अभ्यासात हुशार असलेली काजोल डान्स आणि अभिनयातही बालपणापासून तल्लख होती. ती लहान असतानाच तिचे वडील त्यांच्यापासून दूर झाले होते. काजोल सुरुवातीपासूनच तिच्या आईच्या जवळची होती. ती शिक्षणासाठी बोर्डिंग शाळेत राहत असल्याने आई-वडीलांच्या बिघडत्या नात्याचा तिच्यावर जास्त परिणाम झाला नाही.
वयाच्या 16व्या केली फिल्मी करिअर
1992मध्ये आलेला 'बेखुदी' हा काजोलचा पहिला सिनेमा होता. या सिनेमावेळी काजोल केवळ 16 वर्षांची होती. 1993मध्ये तिला त्यावेळच्या इंडस्ट्रीचा नवीन अभिनेता शाहरुख खानसह 'बाजीगर' सिनेमा करण्यासाची संधी मिळाली. सिनेमा सुपरहिट ठरला आणि काजोलच्या करिअरला कलाटणी मिळाली. साधी दिसणा-या काजोलने अभिनयाच्या जोरावर अनेक सुपरस्टार सिनेमे दिले.
गुंडाराजपासून सुरु झाली लव्हस्टोरी
केवळ 16व्या वर्षी करिअरला सुरुवात करणारी काजोलने एकापाठोपाठ अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. काही वर्षांतच ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली. 24 फेब्रुवारी 1999मध्ये अजय देवगणसह लग्न करून काजोलने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघांची लव्हस्टोरी 'गुंडाराज' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सुरु झाली होती. अजयच्या सांगण्यानुसार, आमच्या प्रेमात आकर्षण नव्हे खरे प्रेम दडलेले आहे. आजच्या स्थितीला दोघांचे विवाहित आयुष्यात आनंदी आहे. त्यांना मुलगा युग आणि मुलगी न्यासा ही दोन मुले आहेत.
चर्चेत राहिले लग्न
मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, या जोडीमध्ये कोणतेच साम्य नाहीये. काजोलने करिअरमध्ये यश मिळत असताना लग्नाचा निर्णय घेऊन चुकिचे केले. अशा अनेक चर्चांना त्यावेळी उधाण आले होते. लग्नानंतर काजोल अजयच्या घरी राहण्यास गेल्यावर सासू-सास-यांसह तिचे पटत नाही असेही म्हटले जात होते. त्यानंतर काजोलने स्पष्ट शब्दात सांगितले होते, की अजयचे आई-वडील मला माझ्या आई-वडीलांप्रमाणे आहेत.
लग्नानंतरही केले निवडक सिनेमे
अजयसह लग्न केल्यानंतर काजोलने सिनेमापासून संन्यास घेतला असे सर्वांना वाटले. मात्र ती तिच्या करिअरमध्ये सक्रिय राहिली. लग्नानंतरसुध्दा तिने काही सिनेमांमध्ये काम केले. त्यातील काही हिट तर काही फ्लॉप ठरले.
काजोलचे हिट सिनेमे
बेखुदी (1992), बाजीगर (1993), ये दिल्लगी (1994), करन-अर्जुन (1995), हलचल (1995), गुंडाराज (1995), दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995), गुप्त (1997), इश्क (1997), प्यार किया तो डरना क्या (1998), दुश्मन (1998), प्यार को होना ही था (1998), कुछ कुछ होता है (1998), दिल क्या करे (1999), हम आपके दिल में रहते है (1999), राजू चाचा (2000), कभी खुशी कभी गम (2001), फना (2006), यू मी और हम (2008), माई नेम इज खान (2010), वी आर फॅमिली (2010)
काजोलच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिची बालपणीपासून ते आतापर्यंतची छायाचित्रे दाखवत आहोत... ते पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...