आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Kareena Kapoor Play Prime Minister Character In New Film

करीना कपूर होणार पंतप्रधान !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाश झा यांच्या ‘राजनीती’ सिनेमाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची चांगली दाद मिळाली. 'राजनीती'नंतर प्रकाश झा आणखी एक राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येत आहे. 'राजनीती' सिनेमात कतरिना कैफने राजकारणी स्त्रीची भूमिका साकारली होती. आता प्रकाश झा यांच्या नव्या सिनेमात अभिनेत्री करीना कपूर राजकारणी स्त्रीच्या भूमिकेत झळकणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

अद्याप नाव न ठरलेल्या झा यांच्या आगामी सिनेमात करीना कपूरबरोबर अजय देवगण स्क्रिन शेअर करणार आहे. सध्या करीनाने सप्टेंबरमध्ये रिलीज होणा-या ‘हिरॉईन’ या सिनेमावर आपलं पूर्ण लक्ष देत. या सिनेमानंतर करीना झा यांच्या सिनामात एकदम सामान्य अर्थातच डी-ग्लॅम लूकमध्ये झळकणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करीना कपूर या सिनेमात महिला पंतप्रधानांची भूमिका साकरणार आहे. या सिनेमाचं शुटिंग यावर्षीच्या अखेरीस सुरू होणार आहे. करीना अजय देवगणबरोबर यापूर्वी 'ओमकारा' चित्रपटात झळकली होती. विशेष म्हणजे या सिनेमासाठी अजयने करीनाचे नाव प्रकाश झांना सुचवले असल्याचीही चर्चा आहे. 'ओमकारा' या चित्रपटातही करीना डी-ग्लॅमलूकमध्ये झळकली होती. महिला पंतप्रधानांची भूमिका करीना ताकदीने पेलू शकले असा विश्वास अजय देवगणला वाटतोय.

एकंदरीतच छम्मक छल्लो करीनाला वेगळ्या रुपात पाहायला तिचे चाहते नक्कीच उत्सुक असणार आहे.
लग्नात करीना परिधान करणार सासूबाई शर्मिलाचा शरारा
PHOTOS : करीना कपूरचा नवा झीरो साईज अंदाज
ऑक्टोबरमध्ये करीना होणार छोट्या नवाबाची बेगम!