(मॉडेल अंकिता शौरी आणि करिश्मा कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर रविवारी एका शॉप ओपनिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. या शॉपचे नाव रेयर हेरिटेज असे आहे. करिश्मासोबत मॉडेल अंकिता शौरीनेसुद्धा इव्हेंटला हजेरी लावली होती.
या इव्हेंटमध्ये करिश्मा ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. तिने अनारकली पॅटर्नचा शॉर्ट स्लीव्ज असेलला व्हाइट सूट परिधान केला होता. त्यावर गोल्डन रंगाचे नक्षीकाम केले होते. ड्रेसवर तिने नेटची ओढणी घेतली होती.
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी करिश्माने केसांचा जुडा घातला होता. कानात आणि हातात गोल्डन ज्वेलरीसुद्धा घातली होती. गोल्डन कलरच्या पर्सने तिचा लूक आणखीनच खुलवला.
तर दुसरीकडे अंकिता शौरीसुद्धा ट्रेडिशनल लूकमध्ये यावेळी अवतरली होती. तिने रेड-गोल्डन कलरचा लाचा परिधान केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये सामील झालेल्या दोन्ही सेलिब्रिटींची खास झलक...