आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Glamorous Actress Koena Mitras Birthday Today

B'Day: नाकावरच्या चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे या ग्लॅमरस अभिनेत्रीचे करिअर आले संपुष्टात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा)
एकेकाळी बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कोयना मित्रा आज आपला 31वा वाढदिवस साजरा करत आहे. 7 जानेवारी 1984 रोजी मुंबईत एका बंगाली कुटुंबात कोयनाचा जन्म झाला. सायकोलॉजी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. शालेय जीवनातच कोयनाने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले होते. 2001मध्ये कोयनाने ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेल इंडियाचा खिताब आपल्या नावी केला.
मिरिंडा, क्लिनिक ऑल क्लिअर, मारुती ऑल्टोसह अनेक नामांकित ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत तिने काम केले आहे. मॉडेलिंगसोबतच बास्केटबॉल, स्विमिंग आणि टेनिसमध्ये या खेळात ती कुशल आहे. इतकेच नाही तर ती पाश्चिमात्य नृत्यशैलीतही पारंगत आहे.
बोल्ड इमेज नाही आली कामी...
कोयनाने 'रोड’ सिनेमातील आयटम सॉंगमधून करिअरला सुरुवात केली होती. 2003मध्ये आलेल्या ’एक खिलाडी एक हसीना’ सिनेमातून फरदीन खानसह लव्ह-मेकिंग सीन दिल्यामुळे बोल्ड इमेजने तीन बरीच चर्चेत आली होता. मात्र काही काळच तिची ही इमेज टिकू शकली.
चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे करिअर आले संपुष्टात..
कोयनाने नाकावर प्लास्टिक सर्जरी करुन घेतली होती. त्यामुळे तिच्या नाकाचा आकार फारच बिघडला होता. प्लास्टिक सर्जरी बिघडल्यामुळे ती तब्बल सहा महिने घरीच होती. सार्वजनिक ठिकाणी तिने हजेरी लावली नव्हती. बिघडलेल्या तिच्या चेह-यामुळे तिचे करिअर संपुष्टात आले असे मानले जाते.
कोयनाचे निवडक सिनेमे...
2003 - एक खिलाडी एक हसीन
2004 - मुसाफिर
2005 - ब्लॅकमेल, इन्सान
2006 - अपना सपना मनी-मनी
2007- कॅश
2008 - अनामिका
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कोयनाचा ग्लॅमरस अंदाज छायाचित्रांमध्ये...
(फोटो साभारः कोयना मित्रा ऑफिशियल वेबसाइट)