आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Mallika Sherawat Was Uncomfortable Doing Bold Scenes With Om Puri

PICS: मल्लिका म्हणाली, \'ओम पूरीसोबत बोल्ड सीन देण्यास अजिबात कम्फर्टेबल नव्हते\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मल्लिका शेरावत, अनुपम खेर आणि ओम पूरी)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या मागील काही सिनेमांमध्ये बोल्ड सीन देण्यास मागे-पुढे पाहिले नाही. परंतु यावेळी ती म्हणते, 'डर्टी पॉलिटीक्स'मध्ये तिला ओम पूरी यांच्यासोबत बोल्ड सीन्स देण्यास तिला खूप अडचण आली.
मल्लिका रविवारी (21 डिसेंबर) आगामी सिनेमा 'डर्टी पॉलिटीक्स'च्या ट्रेलर लाँचिंग निमित्त संपूर्ण स्टारकास्टसोबत उपस्थित होती. तिला जेव्हा विचारण्यात आले, की ओम पूरीसोबत बोल्ड सीन्स देण्यात ती किती कम्फर्टेबल होती. त्यावर ती म्हणाली मी अजिबात कम्फर्टबेल नव्हते. परंतु त्यांनी मला कम्फर्टबेल केले. के सी बोकाडिया दिग्दर्शित 'डर्टी पॉलिटीक्स' भंवरी देवी सेक्स स्कॅण्डलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. ओम पूरी यांनी सिनेमात एक राजकिय नेत्याचे पात्र साकारले आहे.
आपल्या पात्राविषयी सांगताना मल्लिका म्हणते, ही एक महत्वकांक्षी महिलेची कहाणी आहे. ती आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सेक्स अपीलचा वापर करते. मल्लिकाने सिनेमा अनोखी देवीचे पात्र साकारले आहे. सिनेमात नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, आशुतोष राणा, गोविंद नामदेव आणि राजपील यादवसुध्दा दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या स्टारकास्टची छायाचित्रे...