आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Monica Bedi Was Connected To Underworld Don

B\'day: एकेकाळी डॉनची गर्लफ्रेंड होती ही अभिनेत्री, प्रेमासाठी भोगला तुरुंगवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी आज (18 जानेवारी 1975) 40 वर्षांची झाली आहे. मोनिकाच्या आयुष्यातील सर्वात कडू सत्य आहे, की तिचे अंडरवर्ल्ड डॉनसोबत होते. पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेली मोनिका आता अंडरवर्ल्डपासून दूर आपले आयुष्य जगत आहे.
मागील दिवसांत टीव्हीवर दिसलेली मोनिका हेदी कधीकाळी अडरवर्ल्ड डॉन अबु सलेम यांची गर्लफ्रेंड होती. दोघांची लव्हस्टोरी दिर्घकाळापर्यंत चर्चेत होती. सप्टेंबर 2002मध्ये बनावट कागदपत्राने पोर्तुगिलला जात असताना सलेमसोबत मोनिकालासुध्दा अटक करण्यात आली होती. मोनिकावर बनावट पासपोर्ट बनवण्याचासुध्दा आरोप होता. 2006मध्ये तिला भारतीय कोर्टाने पासपोर्टच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती. नोव्हेंबर 2012मध्ये ती तुरुंगातून बाहेर आली होती.
दुबईमध्ये झाली होती ओळख -
तुरुंगातून सुटल्यानंतर एका मुलाखतीत मोनिकाने स्वीकारले, की तिला पैशांवर नव्हे अबू सलेमवर प्रेम होते. तिने सांगितले होते, की ती सलेमसोबत फोनवर बोलत होती आणि तिथून त्यांची मैत्री वाढली. अबु सलेमने तिला तो एक उद्योगपती असल्याचे सांगितले होते. दोघांची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. मोनिकाच्या सांगण्यानुसार, त्यावेळी तिला ठाऊक नव्हते, की अबू सलेम कोण आहे.
मोनिका बेदीचे फिल्मी करिअर-
तिने 1994मध्ये आलेल्या 'मै तेरा आशिक' सिनेमामधून करिअरला सुरुवात केली. मुख्य अभिनेत्री म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरलेला सिनेमा म्हणजे, ‘सुरक्षा’ (1995). या सिनेमात तिच्यासोबत सैफ अली खान होता. हिंदी व्यतिरिक्त तेलगु सिनेमांतसुध्दा तिने काम केले आहे. सध्या मोनिका पंजाबी सिनेमांमध्ये काम करत आहे. मोनिकाच्या बॉलिवूडच्या चर्चेतील सिनेमांमध्ये, ’आशिक मस्ताने’, ’तिरछी टोपीवाले’, ’जंजीर’, ’जानम समझा करो’, ’जोड़ी नंबर 1’ हे सिनेमे सामील आहेत.
सिनेमांमध्ये मोनिकाचे नाव केवळ अंडरवर्ल्ड डॉनसोबतच्या नात्याने होते. काही दिवसांपूर्वी ती 'सरस्वतीचंद्र' या टीव्ही मालिकेत दिसली होती.
बॉलिवूडमध्ये केवळ मोनिका बेदीच नव्हे तिच्याशिवाय अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अंडरवर्ल्डच्या संपर्कात होत्या. त्यांची अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहे. या अभिनेत्रींना सिनेमांपेक्षा जास्त अंडरवर्ल्डशी संबंध ठेवण्यासाठी जास्त ओळखले जाते. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्या अंडवर्ल्डच्या संपर्कात होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अंडरवर्ल्डशी संबंध ठेवलेल्या अभिनेत्रींविषयी...