आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Namrata Gaikwad News In Marathi, Marathi Film Industry, Divya Marathi

\'ज्ञानोबा माझा’ नाटक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट - नम्रता गायकवाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उद्योजिका होण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर एमबीए करण्याचे ठरवले होते. मात्र, वडिलांसोबत एका एकांकिका स्पध्रेला गेले. तिथेच अशोक समेळांची भेट झाली अन् माझ्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. ‘ज्ञानोबा माझा’ हे नाटक माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरले, असे अभिनेत्री नम्रता गायकवाडने सांगितले.

दै. ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला तिने बुधवारी (16 एप्रिल) भेट दिली. या वेळी तिने संपादकीय विभागातील कर्मचार्‍यांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. नम्रता म्हणाली, नृत्याची आवड मला लहानपणापासूनच होती. त्यामुळे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. कल्याणमध्ये नालंदा विद्यालयात शिकत असताना दरवर्षी शाळेच्या प्रत्येक स्नेहसंमेलनात माझे नृत्य लक्षवेधी ठरायचे. महाविद्यालयातही नृत्यविषयक कार्यक्र मांमध्ये माझा आवर्जून सहभाग असायचाच, पण अभिनेत्री बनावे असे कधी वाटले नव्हते. वडिलांसोबत एकांकिका स्पर्धा पाहण्यासाठी गेले. तिथे दिग्दर्शक अशोक समळ यांच्याशी भेट झाली. त्यांनी मला अभिनयात नशीब आजमावायला हवे, असा सल्ला दिला. त्यांनी मला लगेचच ‘ज्ञानोबा माझा’ या पहिल्या व्यावसायिक नाटकाची संधीही दिली. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये फिरण्याची संधी मिळाली. त्यात मला खूप शिकायला मिळाले, असे तिने नमूद केले.


पुढे वाचा आपल्या प्रवासाविषयी काय म्हणते नम्रता.....