आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress, Who Was Disappeared Suddenly Industry

B'day: फ्लॉप सिनेमांमुळे संपुष्टात आले या ग्लॅमरस अभिनेत्रीचे करिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात संजय दत्तसोबत नम्रता शिरोडकर, उजवीकडे- नम्रता शिरोडकर)
मुंबईः नम्रता शिरोडकर हे नाव आज बॉलिवूडमधून गायब झाले आहे, मात्र 1998मध्ये या ग्लॅमरस अभिनेत्रीने सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले होते. 'जब प्यार किसीसे होता है' या सिनेमात सलमान आणि नम्रताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. आज ही अभिनेत्री आपला 43वा वाढदिवस साजरा करत आहे.
यशस्वी पदार्पणानंतर नम्रताकडे अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या. वास्तव, पुकार, हेरा फेरी, एलओसी कारगिल यांसारख्या हिट सिनेमांमध्ये तिने काम केले. पुकार या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी आयफाचे नामांकन मिळाले होते. नम्रताने आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी सिनेमांमध्ये काम केले. मात्र आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा समावेश होऊ शकला नाही. याच कारणामुळे हळूहळू तिच्या करिअरमध्ये डाउन फॉल सुरु झाला. 2001 ते 2004 या काळात नम्रताने एकुण 13 सिनेमांमध्ये अभिनय केला, मात्र हे सर्व सिनेमे फ्लॉप ठरले. हिंदीसोबतच नम्रताने आपल्या करिअरमध्ये कन्नड, मल्याळम, तेलगू आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले. मात्र हवे तसे यश तिला मिळाले नाही.
फ्लॉप ठरल्यानंतर केले लग्न..
नम्रता शिरोडकरचे फिल्मी करिअर केवळ सहा वर्षांतच संपुष्टात आले. सिनेमांमध्ये अपयश मिळाल्यानंतर 10 फेब्रुवारी 2005 रोजी तिने दक्षिणेतील सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केले. लग्नानंतर नम्रता हैदराबाद येथे स्थायिक झाली आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी असून गौतम कृष्ण हे मुलाचे तर सितारा हे मुलीचे नाव आहे.
तसे पाहता इंडस्ट्रीतून अल्पावधीतच बाहेर पडलेल्या अभिनेत्रींमध्ये नम्रता शिरोडकरसोबतच किमी काटकर, किम शर्मा, तारा शर्मा, फराह नाज, आएशा जुल्का या नावांचाही समावेश आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूडमध्ये अपयश पदरी पडल्यानंतर कोणकोणत्या अभिनेत्रींनी इंडस्ट्रीला रामराम ठोकला...