आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेत्री उषाकिरण यांची नातही पडद्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘भाग मिल्खा भाग’च्या यशानंतर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा ‘मिर्झा साहिबान’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटातून दिवंगत अभिनेत्री उषाकिरण यांची नात संयमी खेर आणि हर्षवर्धन कपूर हे दोन नवे चेहरे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
मेहरा हे प्रथमच एखाद्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट बनवत आहेत. इंग्लंडमधून शिकून परतणार्‍या तरुण व तरुणीची ही कथा आहे.गाणी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिली आहेत. राजस्थानची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात तेथील वाळवंटाऐवजी मेहरा यांनी घागरा, सारंगी या राजस्थानच्या सांस्कृतिक ओळखीवर लक्ष केंद्रित केले आहे. संयमी खेर ही या चित्रपटात साहिबानची भूमिका करणार आहे तर हर्षवर्धन मिर्झाची भूमिका साकारणार आहे.
तिसरी पिढी पडद्यावर
संयमी हिची आई उत्तरा खेर यांनी एकेकाळी मॉडेलिंग केले असून वडील अद्वैत खेर हे उद्योजक आहेत. संयमीच्या पदार्पणाबरोबरच उषाकिरण यांची तिसरी पिढी चिÞत्रपटक्षेत्रात येत आहे. संयमीची बहीण संस्कृतीदेखील या क्षेत्रात काम करीत आहे. संयमी आणि संस्कृती या अभिनेत्री तन्वी आझमी आणि शबाना आझमी यांच्या पुतण्या आहेत.
संयमीने यापूर्वी ‘रे’ या तेलुगू चित्रपटात काम केले आहे.