आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Manishakumari Slapped Director Sharma Of Mumbai Can Dance Saala In Front Of Medi

म्युझिक लॉन्च पार्टीत \'फ्री स्टाईल\', अभिनेत्रीने लगावली दिग्दर्शकाच्या श्रीमुखात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईत एका सिनेमाच्या म्युझिक लॉन्च पार्टीत अभिनेत्री आणि दिग्दर्शकामध्ये फ्री स्टाईल झाली. म्यूझिक लॉन्च पार्टीत प्रसारमाध्यमांसमोरच हा लेट नाइट शो झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये सर्वत्र चर्चेचा विषय झाला. अभिनेत्री मनिषाकुमारीने सांताक्रुझ पोलिस स्टेशनमध्ये दिग्दर्शक सचिंद्र शर्माविरोधात कास्टिंग काऊचची तक्रार दाखल केली यावेळी अभिनेत्री राखी सावंतही तिच्यासोबत होती.
सिनेमात रोल देण्यासाठी दिग्दर्शक सचिंद्र शर्माने 'कॉम्प्रोमाईज' करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप मनिषाकुमारीने केला. या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचे प्रकरण समोर आले आहे.
'मुंबई कॅन डान्स साला' या सिनेमाच्या म्यूझिक लॉन्च कार्यक्रमावेळी राखीसह मनिषाकुमारी स्टेजवर आली आणि तिने सचिंद्र शर्माला जाब विचारला. शाब्दिक चकमकीनंतर मनिषाकुमारीने मीडियासमोर शर्माच्या श्रीमुखात भडकवली, त्यानंतर त्याचाही हात उठला. माध्यमांसमोरच हा ड्रामा सुरु झाल्याने कार्यक्रमात गोंधळ उडाला. त्यानंतर मनिषाकुमारीने सांताक्रुझ पोलिस स्टेशन गाठून दिग्दर्शक शर्माविरोधात कास्टिंग काऊचचा आरोप करत तक्रार दाखल केली.
राखी सावंत म्हणाली, बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीने कोणी महिलांवर अन्याय करत असेल तर, आवाज उठवावाच लागेल. मी अभिनेत्रीसोबतच रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीची अध्यक्षा आहे. अशा पद्धतीने जर कोणी वागत असेल तर, महिलांना घरातच बसावे लागेल. दुसरीकडे सचिंद्र शर्माने मनिषाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे सांगितले. त्याने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला. सचिंद्र शर्माची पत्नी मधु शर्मानेही मनिषाकुमारी आणि राखी सावंतविरोधात तक्रार दाखल केली. मनिषाने काही महिलांनी मारहाण केल्याचाही आरोप केला आहे.

पुढील स्लाइडमध्ये, पार्टीची आणखी छायाचित्रे