(फाइल फोटो- अभिनेत्री स्माइली सूरी)
दिग्दर्शक मोहित सूरीची धाकटी बहीण स्माइली सूरी आणि विनीत बंगेरासह 2 जुलै रोजी लग्नगाठीत अडकली. एका खासगी समारंभात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. याचवर्षी 31 मार्च रोजी दोघांचा साखरपूडा ढाला होता. या दोघांची भेट डान्स क्लासदरम्यान झाली होती. येथे विनीत स्माइलीला नृत्याचे प्रशिक्षण देत होता.
विनीतपूर्वी स्माइलीचे नाव प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखसोबत जोडले गेले होते. शाहीर सध्या स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणा-या महाभारत या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत आहे.
'कलयूग'द्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण...
स्माइलीने 2005 मध्ये 'कलयूग' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. हा सिनेमा स्माइलीचा भाऊ मोहित सूरीने दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून मोहितचासुद्धा हा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर स्माइली 'ये मेरा इंडिया' या सिनेमात झळकली. यामध्ये अनुपम खेर आणि सीमा बिश्वास यांच्या भूमिका होत्या. हा सिनेमा विशेष गाजला नाही. इम्रान हाश्मीच्या 'क्रूक' या सिनेमातसुद्धा स्माइलीने छोटेखानी भूमिका साकारली होती.
'जोधा-अकबर' मालिकेत केले काम...
झी टीव्ही वाहिनीवरील 'जोधा अकबर' या मालिकेत स्माइलीने रकैया सुल्तान बेगमची भूमिका साकारली आहे.
बॉलिवूडशी आहे जुने नाते...
मोहित सूरीची बहीण असलेली स्माइली मुकेश आणि महेश भट्ट यांची भाची आहे. याशिवाय पूजा भट्ट, आलिया भट्ट, राहुल भट्ट, इम्रान हाश्मी तिचे कजिन बहीण-भाऊ आहेत.
ट्रेंड डान्सर आहे स्माइली...
अभिनेत्रीसोबतच स्माइली एक उत्कृष्ट डान्सरसुद्धा आहे. कथ्थकमध्ये तिला प्राविण्य प्राप्त आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर श्यामक दावरच्या ग्रुपमध्ये तिने पाच वर्षे काम केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिनेत्री स्माइली सूरीची खास छायाचित्रे...