(स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेत्री आशालता वाबगांवकर )
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका स्मिता तळवलकर आज अनंतात विलिन झाल्या. बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते.
ब-याच दिवसांपासून स्मिता तळवलकर कर्करोगाने आजारी होत्या. जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र बुधवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
ट्विटरवरुन स्मिता तळवलकर यांना श्रद्धांजली वाहिली. स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्मिता तळवलकर यांच्या अंत्यसंस्काराची छायाचित्रे...