(स्मिता तळवलकर यांचे संग्रहित छायाचित्र)
चौकट राजा, तू तिथे मी, ऊनपाऊस अशा सिनेमांमधील दर्जेदार अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर स्वतःची वेगळी छाप पा़डणा-या ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे आज (6 ऑगस्ट) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्या 59 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात स्मिता तळवलकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी दादर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील स्मितहास्य हरपले, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. मनमिळावू स्वभावाच्या स्मिता ताईंच्या चेह-यावर नेहमी हास्य असायचे. दिलखुलासपणे हसून त्या सर्वांची भेट घ्यायच्या. त्यांच्या निघून जाण्यामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय.
पुढील स्लाईड्सवर पाहा स्मिता तळवलकर यांची निवडक संग्रहित छायाचित्रे...