आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Actress Sonakshi Sinha’S Brothers Luv And Kush Sinha

हे आहेत सोनाक्षी सिन्हाचे जुळे भाऊ, पाहा बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या छायाचित्रात लव (डावीकडे) आणि कुश सिन्हा. आईवडील आणि बहिणीसोबत लव-कुशची छायाचित्रे)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा भाऊ कुश सिन्हा 18 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकला. 31 वर्षीय कुशचे लग्न लंडनची रहिवासी असलेल्या तरुणा अग्रवालसोबत धूमधडाक्यात झाले. या लग्नात फिल्म इंडस्ट्रीसोबतच राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. कुश सोनाक्षीचा थोरला भाऊ असून त्याला एक जुळा भाऊसुद्धा आहे. कुश फिल्म मेकिंगमध्ये हात आजमावत आहे.
कुश सिन्हाचे करिअर..
गतकाळातील प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना जुळी मुले असून लव आणि कुश ही त्यांची नावे आहेत. लव आणि कुशचा जन्म 5 जून 1983 रोजी झाला. लव अभिनयात आपले नशीब आजमावत आहे, तर कुशला दिग्दर्शन क्षेत्रात करिअर करायचे आहे. कुश लवकरच सोनाक्षी सिन्हासोबत एका जाहिरातीचे शूटिंग करणार आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीची पहिली कमर्शिअल जाहिरात कुशनेच दिग्दर्शित केली होती. याशिवाय कुशने दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांना 'सांवरिया' आणि अभिनव कश्यप यांना 'दबंग' आणि 'बेशरम' या सिनेमांसाठी असिस्ट केले होते.
भावांच्या वरचढ ठरली सोनाक्षी..
सोनाक्षी आपल्या भावांपेक्षा वयाने जवळजवळ चार वर्षे लहान आहे. मात्र तिचे दोघेही भाऊ स्टारडममध्ये तिच्या मागे आहेत. लव सिन्हा कुशपेक्षा काही मिनिटे मोठा आहे. लवने 'सदिया' (2010) या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याचवर्षी सोनाक्षीनेसुद्धा सलमान खानसोबत 'दबंग' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले होते. पहिल्याच सिनेमातून सोनाक्षी प्रसिद्धीझोतात आली, मात्र लव प्रसिद्ध मिळवण्यात अपयशी ठरला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लव आणि कुश सिन्हाची आपल्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...