आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sonalee Kulkarni In Marathi Film Rama Madhav

पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेचे शिवधनुष्य पेलणार सोनाली, जाणून घ्या तिच्याविषयी बरेच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रमा माधव' या सिनेमातील सोनालीचा लूक.)

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सोनाली कुलकर्णीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला 'रमा माधव' हा सिनेमा उद्या (8 ऑगस्ट) प्रदर्शित होतोय. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारण्याची संधी सोनालीला मिळाली आहे. या सिनेमात ती रघुनाथराव पेशवे यांची द्वितीय पत्नी आनंदीबाईंची भूमिका साकारत आहे.
या सिनेमाची दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांच्या मनात आनंदीबाईंच्या भूमिकेसाठी पहिले नाव आले ते सोनालीचेच. त्यांनी तिला या भूमिकेसाठी विचारणा करताच सोनालीने कुठलाही विचार न करता लगेच होकार दिला. या सिनेमात सोनाली भरजरी साड्या आणि दागिन्यांमध्ये दिसणार आहे.
'रमा माधव' या सिनेमाती ऐतिहासिक भूमिकेत झळकणारी सोनाली खासगी आयुष्यात मात्र ग्लॅमरस आहे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या ऐतिहासिक भूमिकेचं शिवधनुष्य पेलणा-या सोनालीच्या भूमिकेविषयी आणि तिच्या खासगी आयुष्याविषयी बरेच काही आणि पाहा तिची ग्लॅमरस लूकची छायाचित्रे...