आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sonam Kapoor Hospitalised During The Shooting Of Prem Ratan Dhan Payo

'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर सोनम पडली आजारी, 3 दिवस होती रुग्णालयात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः सोनम कपूर)
मुंबईः बॉलिवूडची फॅशन दीवा सोनम कपूर तीन दिवस मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल होती. बातम्यांनुसार, सोनमला श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्जत येथे सुरु असलेल्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या सेटवर सोनमला हा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 9 फेब्रुवारी रोजी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
अलीकडेच सोनमने इंस्टाग्रामवर आपले एक छायाचित्र शेअर केले. या छायाचित्रात तिच्या हाताला सलाईनची नळी लागलेली दिसते. या छायाचित्रासोबत तिने लिहिले, की आजारी पडल्यामुळे वाईट वाटत आहे..
सोनमच्या एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार, तिला अस्थमाचा अटॅक आला होता. त्यामुळे तिला श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. आता सोनमच्या तब्येतीत सुधारणा झाली असून लवकरच ती सिनेमाचे शूटिंग सुरु करणार आहे.
'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात सोनम सलमान खानसोबत झळकणार आहे. यांच्यासोबत नील नितीन मुकेश आणि स्वरा भास्कर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत.