बॉलिवूडमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून दररोज असंख्य तरुण-तरुणी मुंबईत दाखल होत असतात. काहींना येथे यश मिळतं, तर काहींना अपयशी होऊन परताव लागतं. 1988 मध्ये बख्तावर मुराद खान नावाच्या तरुणीने
आपले नशीब आजमावण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. बख्तार मुराद खान हे नाव तुमच्या परिचयाचे नाहीये, कारण या अभिनेत्रीला सर्वजण सोनम या नावाने ओळखतात. आज अभिनेत्री सोनमने वयाच्या 42व्या वर्षात पदार्पण केले आहे. 2 सप्टेंबर 1975 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला.
आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणा-या सोनमचे सौंदर्यच तिची फिल्म इंडस्ट्रीतील ओळख होती. तोकडे कपडे घालून एक्स्पोज करायला तिची हरकत नसायची. तिचा बोल्ड अंदाज बघण्यासाठी प्रेक्षक थिएटरकडे वळत होते. सोनमच्या सिनेमात काही गाणी, एखाद-दोन बोल्ड आणि इमोशनल सीन्स असायचे. म्हणजेच तिला सिनेमात ग्लॅमरसाठी साईन करण्यात येत होते.
'विजय' (1988) या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेणा-या सोनमचा 'इंसानियत' (1994) हा शेवटचा सिनेमा होता. या सहा वर्षांत सोनमने 23 हिंदी सिनेमात अभिनय केला. मात्र अंडरवर्ल्डकडून झालेल्या हल्ल्यानंतर ती देश सोडून यूकेत शिफ्ट झाली.
आज सोनम (बख्तावर मुराद खान)च्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या फिल्मी करिअरपासून ते खासगी आयुष्याची माहिती या पॅकेजमध्ये मिळणार आहे. शिवाय सोनम यूकेत का स्थायिक झाली, याचे उत्तरदेखील यामध्ये आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सोनमविषयी...