आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Swara Bhaskar Stuck To Tweeted Over Modi

मोदींवरील ट्विटने अभिनेत्री अडकली वादात, आक्षेपार्ह्य कॉमेंट्सने त्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले ऐतिहासिक यश आणि सोमवारी नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्यामुळे मोदी समर्थक आनंदात आहेत. बॉलिवूडही यात मागे नाही. त्यातच अभिनेत्री स्वरा भास्कर एका वादात अडकली आहे.
स्वराने मोदीविरोधात एक ट्विपण्णी केली आणि त्यानंतर तिच्या ट्विटर पेजवर मोदी समर्थकांनी आक्षेपार्ह्य ट्विटचा जणू पुरचा आणला.
स्वराने नरेंद्र मोदींच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुजरात दंगलींचा उल्लेख केला होता. तेव्हापासून ती मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आली. अतिशय वाईट कॉमेंट्सचा तिला सामना करावा लागला. एका कॉमेंटच्या उत्तरात तिला सांगावे लागले, की माझा कोणीही मुस्लिम बॉयफ्रेंड नाही. माझ्याकडे स्वतःचे डोके आहे, मी विचार करु शकते.
मोदी समर्थकांनी स्वरावर हिंदू विरोधी असल्याचाही आरोप केला. स्वरा भास्कर प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा टीव्ही शो 'संविधान: मेकिंग ऑफ दि इंडियन कॉन्स्टीट्यूशन'मध्ये चमकली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, स्वराने काय दिली प्रतिक्रिया....