आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Udita Goswami Who Turns 31 Today Is Famous For Portraying Bold Roles

B'DAY SPL: 31 वर्षांची झाली उदिता, बोल्ड इमेजमुळे गुंडाळले गेले करिअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः उदिता गोस्वामी)
मुंबईः 'पाप' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उदिता गोस्वामी आज 31 वर्षांची झाली आहे. एक काळ असा होता, जेव्हा उदिता आपल्या बोल्ड इमेजमुळे विशेष चर्चेत होती. सिनेसृष्टीत पदार्पण करणा-यापूर्वी उदिताने जाहिरातींत काम केले होते.
उदिताचा जन्म 9 फेब्रुवारी 1984 रोजी देहरादून येथे झाला. तिची आई नेपाळी तर वडील गढवाल आहेत. उदिताचे बालपण काठमांडूमध्ये गेले. पुढे शिक्षणासाठी ती देहरादून येथे परतली. येथील प्रसिद्ध कँब्रियन हॉल आणि डीएव्ही पब्लिक स्कूलमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले.
ग्रॅज्युएशननंतर उदिता मायानगरी मुंबईत दाखल झाली. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तिला बराच संघर्ष करावा लागला. करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिने पेप्सी आणि टायटन वॉचच्या कमर्शिअल जाहिरातींमध्ये काम केले. 2003 मध्ये तिने पूजा भटच्या 'पाप' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जॉन अब्राहम या सिनेमात तिचा हीरो होता. आपल्या पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन्स देऊन उदिता प्रसिद्धीझोतात आली होती. 2005मध्ये इमरान हाश्मी स्टारर 'जहर' या सिनेमात ती झळकली. 2006मध्ये 'अक्सर' या सिनेमात तिने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाज प्रेक्षकांना दाखवला आणि चर्चा एकवटली.
बोल्ड इमेजचा फटका उदिताच्या करिअरला बसला. एकाच धाटणीच्या भूमिका तिला ऑफर होऊ लागल्या. उदिताचे 'अगर', 'किससें प्यार करुं' आणि 'फॉक्स' हे सिनेमे कधी रिलीज झाले, हे प्रेक्षकांना कळलेदेखील नाही. उदिताचे हिरोईन म्हणून सिने करिअर गुंडाळले गेले. त्यानंतर तिने फॅशन इंडस्ट्रीकडे आपला मोर्चा वळवला आणि 2013मध्ये दिग्दर्शक मोहित सूरीसोबत लग्न करुन संसार थाटला. या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव देवी आहे. उदिताने सिनेकरिअरला अलविदा म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उदिता गोस्वामीची काही निवडक छायाचित्रे...