(अभिनेत्री योगिता दांडेकर)
मुंबई- मधुर भंडारकर यांच्या 'ट्रॅफिक सिग्नल' सिनेमात काम केलेली अभिनेत्री योगिता दांडेकरसोबत शुक्रवारी (12 डिसेंबर) एक घटना घडली. एका बिझनेसमनने तिला भररस्त्यात मारहाण केली. यावेळी बिझनेसमनच्या कारचालकानेसुध्दा तिला मारले. घटनेवेळी बघणा-या लोकांना तिला मदत केली नाही. त्यानंतर काही वेळाने पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तिघांना पोलिस ठाण्यात नेऊन या घटनेची चौकशी केली.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, योगिता दोन दिवसांपूर्वी जुहू परिसरातील घरी जात होती. आरोपी
बिझनेसमन हंसराज सुरानाची गाडी तिच्या गाडीच्या पुढे होती. गाडी सुरानाचा चालक कृष्णा कुमार चालवत होता. सुरानाचे म्हणणे आहे, की योगिताच्या गाडीने त्यांच्या गाडीला मागून ठोकले. मात्र, योगिता यास नकार देतेय. योगिताचा आरोप आहे, की सुराना आणि त्याच्या चालकांनी तिला गाडीबाहेर ओढले आणि मारहाण केली. यावेळी लोकांनी केवळ बघ्याची भूमिका साकारली होती. कुणीच तिच्या मदतीसाठी धावून आले नाही.
योगितानेसुध्दा पोलिस येईपर्यंत आरोपींना जाऊ दिले नाही. सांताक्रूज पोलिसांनी आरोपी बिझनेसमन हंसराज सुराना आणि त्याचा चालक कृष्णा कुमार यांना अटक केली आहे. दोघांच्या विरोधात मारहाण आणि छेडछाड केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली होती. मात्र दोघे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या अभिनेत्रीची छायाचित्रे...