आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परदेशी तरुणावर जडला जीव, जुहीसमवेत या अभिनेत्रींनी NRIसोबत थाटले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः जय महेता आणि जुही चावला)
बॉलिवूडमधील अशा ब-याच अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र लग्नानंतर सिनेसृष्टीपासून काही काळ ब्रेक घेतला. यापैकी काही अभिनेत्रींनी सिनेसृष्टीतील पुरुषाची निवड न करता परदेशी तरुणासोबत लग्न थाटले. अशीच एक अभिनेत्री म्हणजे जुही चावला. आज (13 नोव्हेंबर) जुही आपला 47वा वाढदिवस साजरा करत आहे.
मनमोहक डोळे, कोणालाही प्रेमात पाडेल असे हास्य आणि कमालीचे सौंदर्य असलेल्या जुहीने एनआरआयसोबत गुपचुप लग्न थाटले होते. विशेष म्हणजे बरेच दिवस तिने आपल्या लग्नाची बातमी उघड होऊ दिली नव्हती.
जुहीचे लग्न ब्रिटीश बेस्ड उद्योगपती जय मेहतासोबत झाले आहे. माजी मिस इंडिया जुही चावला आणि जय मेहता बरेच वर्षे डेट करत होते. मात्र त्यांनी आपल्या प्रेमाचा सुगावा कुणालाही लागू दिला नाही. 1997 मध्ये दोघांनी गुपचुप लग्न थाटले. जेव्हा जुही गर्भवती राहिली तेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी उघड झाली.
लग्न आणि आई झाल्यानंतर जुहीने सिनेमांत काम करणे कमी केले आहे. जय आणि जुहीला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या एनआरआय तरुणासोबत लग्न थाटणा-या अभिनेत्रींविषयी...