(राणी मुखर्जी, समीरा रेड्डी, आहना देओल)
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आज अनेक महिला करवा चौथचे व्रत करत आहेत. करवा चौथ साजरा करणा-यांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन यांच्यापासून ते ट्विंकल खन्ना, श्रीदेवीपर्यंत अनेक अभिनेत्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.
काही अभिनेत्रींचा लग्नानंतरचा हा पहिलाच करवा चौथ आहे. यामध्ये प्रामुख्याने राणी मुखर्जीच्या नावाचा समावेश होतो. राणी मुखर्जीचा लग्नानंतरचा हा पहिला करवा चौथ आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणी सध्या परदेशात आहे. त्यामुळे ती हा सण साजरा करणार की नाही हे सांगता येत नाही. मात्र पती आदित्यप्रमाणेच राणीसुद्धा आता
आपले खासगी आयुष्य मीडियापासून दूर ठेऊ इच्छिते. त्यामुळे कदाचित ती परदेशात असावी, असा अंदाज वर्तवला जातोय. राणीने याचवर्षी 21 एप्रिल रोजी निर्माते आदित्य चोप्रासोबत इटलीत गुपचुप लग्न थाटले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आणखी कोणत्या सेलिब्रिटींचा लग्नानंतरचा हा पहिलाच करवा चौथ आहे...