आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actresses Who Were Physically Abused By Their Partners

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युक्तापासून ते ऐश-झीनतपर्यंत, जेव्हा जोडीदाराच्या मारहाणीला बळी पडल्या या अभिनेत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून अभिनेत्री युक्ता मुखी, ऐश्वर्या राय बच्चन आणि झीनत अमान)
माजी जगतसुंदरी आणि अभिनेत्री युक्ता मुखी हिला अखेर पतीकडून कायदेशीररित्या घटस्फोट मिळाला आहे. सामंजस्याने युक्ता आणि प्रिन्स तुली यांनी घटस्फोट घेतला. काही महिन्यांपूर्वी युक्ताने पती आणि सासरच्‍या मंडळीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी नव-याने मारहाण केल्‍याचा आरोप युक्ताने या तक्रारीत केला होता. तसेच पतीने अनैसर्गिक शारीरीक संबंध ठेवल्‍याचाही आरोप तिने केला होता.
युक्ता आणि प्रिन्सचे लग्न 2 नोव्हेंबर 2008 रोजी झाले होते. प्रिन्स नागपूरमधील बडे व्यावसायिक आहेत. या दोघांना एक मुलगा आहे. जुलै 2013 मध्ये युक्ता मुखीचा पती प्रिन्‍स तुली आणि त्‍याच्‍या आईवडलांविरुद्ध युक्ता मुखीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.
घरगुती हिंसा हा अपराध आहे. स्त्रिया अनेकदा घरगुती हिंसेला बळी पडतात. फक्त सामान्य स्त्रियाच नव्हे तर अभिनेत्रीही हिंसेला बळी पडल्या आहेत. यापूर्वीही अनेक अभिनेत्रींना त्यांच्या प्रियकराकडून किंवा पतीकडून मारहाण झाली आहे.
पुढे वाचा, ऐश्वर्या पासून ते श्वेतापर्यंत, या अभिनेत्रींनी सहन केला आहे शारीरिक आणि मानसिक छळ...