आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे या रिअल लाईफ जोडीचा नवा थरारपट \'अनवट\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, मकरंद अनासपूरे या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला 'अनवट' हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रहस्य, रोमांचचा तडका असलेला 'अनवट' हा थरारपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे.

‘अनवट’ हा १९७५ सालच्या कोकण, गोवा आणि हैदराबाद येथील पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटाचा पूर्वीचा काळ तसाच ठेवून एक पिरीयड सिनेमा साकारण्यात आला आहे. त्याकरता आधुनिकतेचा स्पर्श झालेले कोकणातले दुर्गम गाव चित्रीकरणासाठी निवडण्यात आले.

या चित्रपटाचे संगीत वेगळे असण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पं.हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनात हिंदीतले सुप्रसिद्ध संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे.

या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...