(हॅलोवीन पार्टीत श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर)
मुंबईः सिल्व्हर स्क्रिनवर
आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भूरळ घालणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर शुक्रवारी भयावह रुपात दिसली. निमित्त होते हॅलोवीन डेचे. हॅलोवीनच्या निमित्ताने बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी हॅलोवीन पार्टी साजरी करण्यासाठी मुंबईस्थित नीडो येथे पोहोचले होते.
श्रद्धा कपूर यावेळी ब्लॅन स्वानमध्ये एव्हिल रुपात दिसली. तिने ब्लॅक स्कर्ट परिधान केला होता. तर दुसरीकडे आदित्य मास्क मॅन बनला होता. त्याने जोकरचे मास्क लावले होते. पार्टीत इवलिन शर्मा, भाग्यश्री पटवर्धन, अनुषा दांडेकर सहभागी झाल्या होत्या.
का साजरा केला जातो हॅलोवीन डे?
दरवर्षी 31 ऑक्टोबरला हा भुताटकीचा आगळावेगळा आनंदी आणि कलात्मक सण पाश्चिमात्य देशांमध्ये साजरा होतो. असे म्हटले जाते, की पुर्वजांच्या आत्म्याला खुश करणे गरजेचे असते. कारण आत्मा नाराज असली तर ती आपल्याला नुकसान पोहोचू शकते, असे पाश्चिमात्य देशातील लोकांचे मत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नीडोमध्ये झालेल्या हॅलोवीन पार्टीतील सेलेब्सची छायाचित्रे...