मुंबई - प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या लग्नाला एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. या दोघांनी गेल्या महिन्यात 21 एप्रिल रोजी इटलीत गुपचुप लग्न थाटले. आता या दोघांच्या लग्नाविषयी सर्वांनाच ठाऊक आहे.
हे नवदाम्पत्य अलीकडेच इटलीहून मुंबईत परतले. इटलीहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या राहत्या घरी एका खासगी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाटी बी टाऊनचे अनेक स्टार्स पोहोचले होते.
अनुपम खेर आणि त्यांच्या पत्नी किरण खेर, करण जोहर आणि त्याची आई हीरु जोहर, नील नितिन मुकेशचे वडील नितिन मुकेश आणि त्याची आई निशी, अभिनेते सिद्धार्थ काक आणि त्यांच्या पत्नी गीता या पार्टीत सामील झाले होते.
लग्नानंतर मुंबईत एक ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी आयोजित करण्याच्या विचारात आदित्य आणि राणी आहेत. त्यापूर्वी त्यांनी ही छोटेखानी पार्टी आयोजित केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा आदित्य-राणीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...