आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Roy Kapoor Spotted At Shraddha’S House At Midnight

माध्यमांना चकमा देऊन मध्यरात्री श्रध्दाला भेटण्यासाठी गेला आदित्य राय कपूर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'आशिकी 2' फेम आदित्य राय कपूर आणि श्रध्दा कपूर यांच्या अफेअरच्या माध्यमांमध्ये अनेक बातम्या आलेल्या आहेत. मात्र अलीकडेच एक असा प्रसंग समोर आला ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बातमी आहे, की आदित्यला रात्री उशीरा श्रध्दा कपूरच्या घराजवळ बघितल्या गेले आहे. ही गोष्ट 7 जूनची आहे.
एका लीडिंग मिडिया हाऊसनुसार, आदित्यला श्रध्दाच्या जुहू परिसरातील अपार्टमेंटच्या बाहेर बघितल्या गेले आहे. सुत्रांनी सांगितल्याप्रमाणे, तो सुरूवातीला आपल्या बीएमडब्ल्यू कारने श्रध्दा ज्या परिसरात राहते त्या परिसराभोवती फिरत होता. रात्री जवळपास 10 वाजता आदित्यने श्रध्दाच्या इमारती बाहेर आपली कार थांबवली. काहीवेळ कारमध्ये वाट बघितल्यानंतर तो घरात गेला. सकाळपर्यंत त्याची कार त्याच कंपाउंडमध्ये उभी होती.
सुत्रांनी असेही सांगितले, की जुहू परिसरातील श्रध्दाच्या घरी जाताना सनी सुपर स्टुडिओसुध्दा लागते. तिथे उपस्थित काही ओळखीच्या लोकांना आणि माध्यमांना चकमा देऊन आदित्य निघून गेला. एवढ्या रात्री आदित्यचे श्रध्दा काय काम होते हे त्या दोघांनाच ठाऊक?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'आशिकी 2'च्या शुटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांना आले होते उधाण, सिध्दार्थ मल्होत्रासोबतसुध्दा जोडले आहे नाव...