आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aditya, Tabu, Sonali Catches A Screening Of Ek Villain

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'एक व्हिलेन'च्या Screeningला आदित्य, तब्बू, दियासह अनेक सेलेब्सनी लावली हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री दिया मिर्झा, अभिनेत्री तब्बू आणि अभिनेता अदित्य राय कपूर
मुंबई: दिग्दर्शक मोहित सूरीच्या 'एक व्हिलेन' शुक्रवारी 27 जूनला रोलीज होणार आहे. सिनेमामध्ये रितेश देशमुख, सिध्दार्थ मल्होत्रा आणि श्रध्दा कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होण्यासाठी प्रमोशनसह सिनेमाच्या स्क्रिनिंगचा सिलसिला सुरू झाला आहे. काल (25 जून) मोहित सूरीने सिनेमाच्या स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. त्यामध्ये बी-टाऊनच्या अनेक सेलेब्सनी उपस्थिती लावली होती.
अभिनेत्री तब्बू, दिग्दर्शक केन घोष निर्माता मुकेश भट्ट, अभिनेत्रीपासून निर्माती झालेली दीया मिर्झा, अभिनेत्री मीरा चोप्रा, अभिनेता आदित्य राय कपूर आणि अर्जुन बाजवासह अनेक स्टार्स या स्क्रिनिंगमध्ये सामील झाले होते. सिनेमाचा दिग्दर्शक मोहित सूरी पत्नी उदिता गोस्वामीसह स्क्रिनिंगमध्ये पोहोचला होता. तसेच सोनाली बेंद्रे पती गोल्डी बहलसह पोहोचली होती.
'एक व्हिलेन' 'आय सॉ द डेव्हिल' कोरिअन सिनेमाच्या स्टोरीवर आधारित आहे. आतापर्यंत सिनेमांमध्ये कॉमिक भूमिका साकारणारा रितेश या सिनेमात नवीन अवतारात दिसणार आहे. तसेच, 'स्टुडेंट ऑफ द इअर' आणि 'हंसी तो फंसी'मध्ये केलेला सिध्दार्थ मल्होत्रा सिनेमात नकारात्मक भूमिका साकारत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा 'एक व्हिलेन'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...