('आय लव्ह दुबई' या सिनेमाच्या फस्ट लूक लॉन्चवेळी शांती डायनामाइट)
मुंबई - सनी लियोननंतर आता आणखी एक पोर्न स्टार मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या अॅडल्ट स्टारचे नाव आहे शांती डायनामाइट. 'आय लव्ह दुबई' या सिनेमाद्वारे शांती बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहे. या सिनेमाचा फस्ट लूक अलीकडेच मुंबईत लाँच करण्यात आला. या सिनेमाद्वारे इकराम अख्तर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. हा सिनेमा वाउ फिल्मवाले बॅनरची निर्मिती आहे.
या सिनेमाची कहाणी कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपभोवती गुंफण्यात आली आहे.
आपल्या कॉलेजमधून या ग्रुपची निवड दुबई इंटरनॅशनल ड्रामा कॉन्टेस्टसाठी होते. दुबई दाखल झाल्यानंतर या मित्रांच्या ग्रुपला नाइट लाइफ आणि मजामस्ती करण्यासाठी स्वातंत्र्य मिळते. सर्वकाही नीट सुरु असताना अचानक असे काही घडते, की त्यामुळे त्यांचे आयुष्यच पालटून जाते. पुढे त्यांच्यासोबत काय घडतं, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.
या सिनेमात शांतीसह एजाज खान आणि राजीव बग्गा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'आय लव्ह दुबई' या सिनेमाच्या फस्ट लूक लाँचवेळी क्लिक झालेली शांती डायनामाइट आणि एजाज खानची काही छायाचित्रे...