आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2700 थिएटर आणि 4200 स्क्रिनवर झळकला 'पीके', झाली अॅडव्हान्स बुकिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिर खानचा 'पीके' एकूण 2700 थिएटरमध्ये आणि 4200 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. काही वेळेतच पीव्हीआरच्या ऑल इंडिया चैनमध्ये 1 लाख 10 हजार तिकीट आणि आयनॉक्समध्ये 85 हजार तिकीट बुक झालेत.

सिनेमाच्या वादग्रस्त पोस्टर असो अथवा पान चावणारा आणि भोजपूरी बोलणारा आमिर, 'पीके' दिवाळीपासून प्रेक्षकांची क्रेज बनला आहे. 'गजनी'मध्ये आमिकने केवळ बाल्ड लूक केलाच नव्हे त्याचे तशा अवतारात सिनेमाचे प्रमोसशदेखील केले होते.
त्यानंतर '3 इडियट्स'मध्ये तो गेटअप बदलून शहरा-शहरांत फिरला. त्यानंतर इंडस्ट्रीचा ट्रेंडच बदलण्यात आला. छोटे-मोठे प्रत्येक टीव्ही आणि इतर शो प्रमोशनसाठी निवडण्यात आले.
परंतु आमिर या सिनेमासाठी कोणत्याही शोमध्ये गेला नाही किंवा इतर मार्केंटिंग केली. निवडक शहरांची आणि चाहत्यांची त्याने भेट घेतली. त्याने पीकेच्या पात्राचे रहस्य कायम गुपित ठेवले.
दोन महिन्यांपासून चांगल्या सिनेमाच्या प्रतिक्षेत असलेल्या उद्योग क्षेत्राला या सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत. पीकेला पहिल्या दिवशी 30 कोटींची ओपनिंग मिळेल अशी सर्व अपेक्षा बाळगून आहेत. शुक्रवारी (19 डिसेंबर) वर्किंग डे असतो आणि ख्रिसमसच्या सुट्या अद्याप लागलेल्या नाहीत. तरीदेखील सिनेमा अपेक्षे इतकी कमाई करू शकतो असा दाट विश्वास आहे.
तिकीटाचे दर वाढवणार असल्याचे संकेतसुध्दा मार्केटकडून मिळत आहेत. 20 वर्षांपूर्वी केवळ वर्षातून एकदाच दिवाळीला तिकीटाचे दर वाढत होते. परंतु मल्टिप्लेक्स कल्चर आल्यानंतर तिकीटाची परंपरा बदलली आहे. वर्षातून तीनवेळी रिलीज झालेल्या मोठ्या सिनेमांच्या तिकीट दरात बदल होत आहे. यावर्षी सलमान खानचा 'किक', शाहरुख खानचा 'हॅपी न्यू इअर'च्या तिकीट दरातसुध्दा बदल झाला होता.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, सिनेमाचे वितरक डिज्नी/यूटीव्हीने 10-15 टक्के तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तिकीट दर वाढून पीकेचे तिकीट दर 'हॅपी न्यू इअर' इतकेच असणार आहे.