आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Deepika, Sonam Are Also Looking For New Home

दीपिकानंतर आता सोनम कपूर शोधत आहे नवीन आशियाना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण एक घर खरेदी करणार आहे. तसेच तिच्या नजरेत दोन बंगले असून त्यांची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे, असे वृत्त नुकतेच ऐकण्यात आले होते. आता बातमी आहे की, अभिनेत्री सोनम कपूरही घराच्या शोधात आहे. सोनम सध्या वडील अनिल कपूर, आई सुनीता कपूर, भाऊ हर्षवर्धन आणि बहीण रिया यांच्यासोबत जुहू येथील घरात राहते. आता ती नव्या घराचा शोध घेत आहे. तथापि, आई-वडिलांना सोडून एकटे राहण्याची तिची इच्छा नाही. तिला गुंतवणुकीच्या दृष्टीने ही मालमत्ता खरेदी करायची आहे.
सूत्रांच्या मते, सरते वर्ष सोनमसाठी यशस्वी राहिले. तिचे दोन्ही चित्रपट ‘रांझणा’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ने चांगली कमाई केली. यातून मिळालेला पैसा गुंतवण्याची तिची इच्छा आहे. त्यामुळे तिने घर खरेदी करण्याचे ठरवले आहे. असे म्हटले जात आहे की, सोमन अंधेरी किंवा वांद्रे दरम्यान दोन ते तीन बीएचके फ्लॅटच्या शोधात आहे. एकदा खरेदी झाल्यानंतर ती भाड्याने देणार आहे. सोनमनेदेखील यास दुजोरा दिला आहे. सोनमने सांगितले की, ‘पहिली गुंतवणूक एखाद्या प्रॉपर्टीत करण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे मुंबईतच फ्लॅटचा शोध घेत आहे. मात्र, मी आपल्या पालकांपासून वेगळी होत आहे, असा त्याचा अर्थ होत नाही.’