मुंबई - अलीकडेच आमिर खानच्या बहुप्रतिक्षित 'पीके' या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. आमिरचे हे पोस्टर देशभरात चर्चेचा विषय ठरले असून त्यावरुन वादाला तोंड फुटले आहे. याचे कारण म्हणजे पोस्टरवर आमिर चक्क नग्नावस्थेत दिसतोय. त्याच्या हातात केवळ एक रेडिओ आहे.
वादग्रस्त ठरलेल्या या पोस्टरमध्ये आमिरच्या सिनेमाच्या क्रिएटीव्ह टीमचा स्वतःचा असा वेगळेपणा नाहीये. हे आम्ही म्हणत नाहीये, तर वरील छायाचित्र पाहून तुमच्यासुद्धा लक्षात येईल. 'पीके'चे पोस्टर चक्क हॉलिवूडची नकल असल्याचे दिसून येत आहे.
'पीके'चे पोस्टर पोर्तुगीज गायक क्युम बेर्रियरयसना याच्या 'रेसेबी कन्वाटमांथी' या अल्बमच्या पोस्टरशी साधर्म्य साधणारे आहे. हा पोर्तुगीज गायक पोस्टरवर नग्नावस्थेत दिसत असून त्याच्या हातात पियानो दिसत आहे. तर आमिरच्या हातात रेडिओ दिसतोय.
तसे पाहता, आमिरच्या सिनेमाचे पोस्टर हॉलिवूडच्या सिनेमाशी साधर्म्य साधणारे असल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीसुद्धा अशी अनेक उदाहरणे दृष्टीस पडली आहेत. गेल्यावर्षी रिलीज झालेला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'धूम 3' या सिनेमाचे पोस्टर 'द डार्क नाइट' या सिनेमाच्या पोस्टरशी साम्य साधणारे होते. तर 'तलाश' या सिनेमाचे पोस्टर 'मिशन इम्पॉसिबल घोस्ट प्रोटोकॉल'च्या पोस्टरसारखे हुबेहुब दिसणारे होते. 'गजनी' या सिनेमाचे पोस्टरसुद्धा याला अपवाद नाहीये. कारण या सिनेमाचे पोस्टर 'मेमेन्टो' या हॉलिवूड सिनेमाच्या पोस्टरची कॉपी होते.
बॉलिवूड सिनेमांमध्ये असे अनेक पोस्टर्स आहेत, जे हॉलिवूड सिनेमांच्या पोस्टर्सशी साधर्म्य साधणारे आहेत. याची अनेक उदाहरणे येथे बघायला मिळतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा असेच काही पोस्टर्स जे हॉलिवूड पोस्टर्सपासून कॉपी केले आहेत...