मुंबई - अलीकडेच अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचे पती संजय कपूर घटस्फोट घेत असल्याची बातमी आली होती. आता बातमी आहे, की घटस्फोटानंतर करिश्मा दुसरे लग्न करणार आहे. होय, करिश्मा सध्या मुंबईतील व्यावसायिक संदीप तोशिवाल यांना डेट करत आहे. लवकरच आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला आहे.
इंडस्ट्रीतील सुत्रानुसार, जेव्हापासून करिश्माच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्या, तेव्हापासून संदीप यांनी तिला भावनिक आधार दिला. संजय कपूरला घटस्फोट देण्यासाठी तिला मदत केली. काऊंसलिंगवेळी तिच्यासोबत राहिले.
सुत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याकाळात दोघांमध्ये जवळीक वाढली. घटस्फोटानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. संदीपसोबत लग्न करण्यासाठी करिश्माने संजयकडे घटस्फोटाची मागणी केली असल्याचेही म्हटले जात आहे. तर दुसरीकडे संदीप तोशिवाल यांना फॅमिली फ्रेंड असल्याचे सांगून मीडियात येणा-या वृत्ताला दाबण्याचा प्रयत्न करिश्माच्या मित्रांनी केला.
अद्याप संदीप आणि करिश्माने सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबूली दिलेली नाही. मात्र करिश्माच्या आईवडिलांनी दोघांच्या नात्याला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते. संदीपचा ग्लॅमर जगताशी संबंध नाहीये. त्यामुळे करिश्मासोबतचे आपले नाते लपवण्यात ते यशस्वी झाले.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, संजयसोबत लग्नापूर्वी अभिषेक बच्चनसोबत झाला होता साखरपुडा...