आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Imran Khan, Has Ranveer Singh Backed Out From Vikramaditya Motwane's Next For Shuddhi?

विक्रमादित्यच्या चित्रपटातून रणवीरची ऐनवेळी माघार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्रमादित्य मोटवानीच्या ‘भावेश जोशी’ या चित्रपटासाठी रणवीर सिंहचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले होते. मात्र रणवीर सध्या या चित्रपटासाठी आपली वेळ दिग्दर्शकांना देत नसल्याची चर्चा आहे. एककाळ असा होता तेव्हा मोटवानीचे आभार मानण्यास रणवीर कधीही थकत नव्हता. याच कारणामुळे त्याच्या मागील इमेजला ब्रेक करत मोटवानीने ‘लुटेरा’ चित्रपटात रणवीरला वेगळ्या अंदाजात सादर केले होते. मात्र दर शुक्रवारी बदलत असलेल्या गणिताप्रमाणे या दोघांचे देखील आपापसातील गणित आता रंग बदलत आहे. ‘लुटेरा’ चित्रपटानंतर संजय लीला भन्सालीच्या ‘गोलियों की रासलीला रामलीला’ या चित्रपटात रणवीरच्या भूमिकेला प्रशंसा मिळाली होती. या यशानंतर ‘गुंडे’ चित्रपटात अर्जुन कपूरपेक्षा कमी वरचढ राहिलेला रणवीर स्टारडममध्ये स्वत:ला पुढे असल्याचे मानतो.
या आत्मकेंद्रित स्टारच्याजवळ अफवाच्या बाजारातूनच ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘शुद्धी’ चित्रपटाची ऑफर येत असली तरी यात काहीच सत्य नाही. करण जोहरने तर याबाबत रणवीर-दीपिकाची निवड करण्याचा माझा विचार नसल्याचे सांगून टाकले आहे, तरीही रणवीरने ‘भावेश जोशी’ हा चित्रपट साइन केला नाही. इम्रान खान या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर मोटवानीने रणवीरचे मत लक्षात घेऊन पटकथेमध्ये आवश्यक तो बदल केला होता.