आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

... बोमन इराणी होणार 'सेमी न्यूड'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फराह खान पहिल्यांदाच सिल्वर स्क्रिनवर बोमन इराणी यांच्या सोबत 'शीरीं की तो निकल पडी' या चित्रपटात ऍक्टिंग करतांना दिसेल. या चित्रपटातील एक रोचक गोष्ट म्हणज़े एका दृश्यामध्ये बोमन टॉवेल परिधान करून असतात आणि फराह समोर सेमी न्यूड होतात.
या चित्रपटाचे निर्माता संजय लीला भंन्साळी आहेत. बोमन यांच्या अगोदर भंन्साळी यांच्या सांवरिया चित्रपटात रणबीर कपूर टॉवेलमध्ये दिसला होता. या दृश्याबद्दल बोमन यांना विचारले असता त्यांनी यावर खुलासा करण्यास नकार दिला. पण त्यांनी सांगितले की, दिग्दर्शक बेला आमच्या दोघांसोबत किसिंग सीनबद्दल चर्चा करत असतांना पहिल्यांदा फराह अवघडली पण, नंतर अचानक ती माझ्याजवळ येऊन मला किस करण्याची प्रॅक्टीस करू लागली. एकंदरीतच, यावेळी बोमन आणि फराह पडद्यावर काहीतरी गरमागरम केमेस्ट्री दाखवणार आहेत हे नक्की.