आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Watching Revolver Rani, No Man Will Want To Marry Me, Kangana

\'रिव्हॉल्व्हर रानी\'नंतर माझ्याशी कुणी लग्न करणार नाही !!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'रिव्हॉल्व्हर रानी' या सिनेमातील माझी भूमिका पाहिल्यानंतर कुणी माझ्याशी लग्न करण्याचे धाडस करणार नाही असे विनोदाने सांगत कंगनाने या सिनेमातील अलका सिंग या अत्यंत बोल्ड व पुरुषी व्यक्तिरेखेचा चित्रीकरणाचा प्रवास उलगडवला.
जूहू येथे जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ती उपस्थितांशी संवाद साधत होती. यावेळी तिच्याबरोबर सिनेमात मध्यवर्ती भूमिका असलेला अभिनेता वीर दास, दिग्दर्शक साई कबीर, सहनिर्माता तिग्मांशू धुलिया उपस्थित होते.
चंबळ खो-यामध्ये 50 अंश सेल्सिअस तापमानत अलकाची भूमिका आणि सिनेमाचे चित्रीकरण करणे तर आव्हानात्मक होतेच शिवाय अलकाची अत्यंत बोल्ड, पुरुषांना बंदुकीच्या टोकावर नाचवणारी भूमिका समजून घेत ती साकारणे खूप अवघड होते असे सांगत कंगनाने क्वीनच्या यशानंतर 'रिव्हॉल्वर रानी'मधील ही भूमिकादेखील यशस्वी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
‘अब मर्द को दर्द होगा’ या कॅचलाइनमागे अलकाचीच भूमिका असल्याचे सांगत तिचा पोशाख, तिचे आक्रमक व बिनधास्त वागणे पाहता प्रत्यक्ष आयुष्यात या भूमिकेनंतर माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय कुणाला घेता येणार नाही असे गमतीने 27 वर्षीय कंगनाने सांगतात सगळे खळखळून हसले. साई कबीर यांचा हा पहिलाच सिनेमा असून या सिनेमाच्या माध्यमातून राजकारणावर ब्लॅक कॉमेडीद्वारे भाष्य केले असले तरी त्यात एक प्रेमकथाही दडली असल्याचे कबीर यांनी सांगितले. येत्या 25 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक ‘क्वीन’ला याही सिनेमात भरभरुन प्रतिसाद देतील असा विश्वास यावेळी तिग्मांशू धुलिया यांनी व्यक्त केला.
'रिव्हॉल्व्हर रानी' या सिनेमाविषयी-
दिग्दर्शक - साई कबीर श्रीवास्तव
कलाकार - कंगना राणावत, पियूष मिश्रा, वीर दास, जाकिर हुसैन
संगीत - संजीव श्रीवास्तव
पुढील स्लाईड्मध्ये पाहा पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या कंगनाची खास छायाचित्रे...