आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Learing Fancing For Bajirao Mastani

\'बाजीराव मस्तानी\'साठी दीपिका शिकतेय तलवारबाजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केरळमध्ये साहसी खेळांपैकी एक प्रमुख खेळ म्हणून ओळख असलेल्या कलरिपयट्टूचे दीपिका मागील काही दिवसांपासून प्रशिक्षण घेत आहे. आता तिने अन्य काही स्टंट शिकणे सुरू केले आहे.
दीपिकाला 'बाजीराव मस्तानी' या आपल्या आगामी चित्रपटासाठी तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकायची आहे. याचे ट्रेनिंग सध्या ती रोहित शेट्टीच्या टीमकडून घेत आहे. रोहित शेट्टी आपल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'मधील आवडत्या जोडीसोबत पुन्हा काम करण्यास उत्सुक असला तरी सध्या त्याने केवळ शाहरुखसोबत काम करणे पसंत केले आहे. लवकरच या चित्रपटांची शूटिंग सुरू होणार आहे.
त्यासोबत पुढील वर्षी अजय देवगणसोबत "सिंघम'मधून परतण्याचा त्याचा विचार आहे. "गोलमाल'च्या चौथ्या भागाची उत्सुकता आहे, पण योग्य कथेच्या शोधत असल्याचे तो सांगतो. दीपिकाचा 'बाजीराव मस्तानी' जरी रोहितचा चित्रपट नसला तरी त्याने या चित्रपटासाठी अावश्यक असलेले ट्रेनिंग देण्याचा मोठेपणा दाखवला आहे. दीपिकादेखील रोहितसोबत काम करण्यास उत्सुक आहे.