आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • AIB Removed Controversial Video From There Official Channel And Youtube

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AIB नॉकआउट: अर्पिताची खिल्ली उडवल्याने सलमान भडकला, चॅनल-युट्यूबवरुन व्हिडिओ काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खान आणि अर्जुन कपूर)

मुंबई: अश्लील वक्तव्य आणि कृतींमुळे वादग्रस्त ठरलेला 'एआयबी नॉकआऊट' या कार्यक्रमाचा व्हिडिओ एआयबीच्या ऑफिशिअल चॅनल आणि युट्यूबवरुन हटवण्यात आला आहे. अश्लीलतेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या शोवर अनेक स्तरांतून टीकेचा सूर उमटत आहे. त्यामुळे कारवाईच्या संकेतांनंतर एआयबीच्या ऑफिशिअल चॅनल आणि युट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ हटवण्यात आला आहे.
गेल्यावर्षी 20 डिसेंबर रोजी झालेल्या या शोमध्ये बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या शोमध्ये करण जोहर, रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांनी अश्लिलतेचा कळस गाठत कमरेखालचे विनोद सादर केले. त्यांच्या सादरीकरणाला दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हासह अनेक कलाकारांनी उत्स्फुर्तपणे दाद दिली होती.
अर्पिताची खिल्ली उडवल्याने सलमान भडकला...
या कार्यक्रमात सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिची खिल्ली उडवण्यात आली. लग्नापूर्वी अर्पिताचे अभिनेता अर्जुन कपूरसोबत काही काळ अफेअर होते. त्यामुळे यावेळी करण जोहर, रणवीर सिंहने तिला निशाण्यावर घेतले होते. बहिणीची खिल्ली उडवण्यात आल्याने सलमान चांगलाच भडकला. त्याने एआयबीच्या आयोजकांना व्हिडिओ काढण्याची ताकिद दिली होती.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही...
एआयबी कार्यक्रमात अश्लिलता असेल आणि कायद्याच्या भंग करणाऱ्या गोष्टी असतील तर त्यावर नक्की कारवाई करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
'राज्य नाट्य सेन्सॉर बोर्ड'नेही या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला आहे. या कार्यक्रमासाठी सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीची आवश्यकता असतानाही ती घेतली नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष राम जाधव यांनी म्हटलं आहे.
करण जोहरचे उत्तर
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आणि निर्माते अशोक पंडित यांनी या शोला व्यासपीठावरील अश्लिल शोचे प्रदर्शन असे म्हणत करण जोहरला सुनावले होते. यावर करण जोहरने ट्विट करुन उत्तर दिले आहे. करण जोहरने ट्विट केले, 'जर आपल्याला वाटते की, हे आपल्या लायकीचे नाहीये तर ते पाहू नका'.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, काय आहे संपूर्ण प्रकरण आणि करण जोहरचे ट्विट...