आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIB Roast Controversy: Aamir Was Mad On Karan Arjun.

AIB Knockout: करण-अर्जुनवर आमिर संतापला, सुनावले खडे बोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोः करण जोहर आणि आमिर खान)

मुंबईः विनोदाच्या नावाखाली अश्लीलता आणि बिभत्सपणाचे दर्शन घडविणाऱ्या 'एआयबी नॉक आऊट' या कार्यक्रमाला काही बॉलिवूड स्टार्सनी पाठिंबा दर्शवला आहे. मात्र बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच अभिनेता आमिर खानने यावर संताप व्यक्त केला आहे. 'एआयबी'च्या व्हिडिओ पाहून निराश झाल्याचे आमिरने मुंबईतील एका कार्यक्रमात म्हटले. आमिर म्हणाला की, "एआयबी हा अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह असून यामुळे मी अतिशय निराश झालो."
आमिर मंगळवारी मुंबईत आयोजित वायफजी 2015 अगेंस्ट करप्शन या कार्यक्रमाच्या पत्रकारपरिषदेत सहभागी झाला होता. येथे त्याने या कार्यक्रमाविषयीची आपली मते नोंदवली.
आमिरने या कार्यक्रमाबाबत करण जोहर आणि अर्जुन कपूरला खडे बोल सुनावले. आमिर म्हणाला, की करण जोहर आणि अर्जुन कपूर माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांनी असे कार्यक्रम करणे मला अजिबात आवडले नाही. या कार्यक्रमातून आपण स्वत: किती आक्षेपार्ह आहोत ते जगाला दाखवण्याचे काम करत आहोत. आपल्यात किती फालतूपणा भरला आहे, हे जगाला दाखवणे योग्य नाही, असे आमिर यावेळी म्हणाला. तसेच या कार्यक्रमाबाबत अनेकांची वेगवेगळी मतं असतील. अनेकांना कार्यक्रम आवडला देखील असेल. पण, त्यातील करण आणि इतरांचे संवाद ऐकून धक्काच बसला असल्याचे आमिरने सांगितले.
आमिर पुढे म्हणाला, प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे हे मान्य पण, त्यासोबत समाजाप्रती जबाबदा-या देखील आहेत. याचा विसर पडता कामा नये आणि एक कलाकार म्हणून मला स्वत:ला सामाजिक भान राखायला हवे.''
एआयबी हा शो गेल्यावर्षी डिसेंहबर महिन्यात मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात करण जोहर, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हासह बरेच बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा व्हिडिओ यूट्युबवर शेअर करण्यात आला होता. मात्र यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर तो युट्यूबवरुन काढण्यात आला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा वायएफजी 2015 या कार्यक्रमात पोहोचलेल्या आमिरचे फोटोज...