आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIB Roast Controversy: Russell Peters Asks Aamir Khan To Shut Up

'आमिरला सांगा गप्प बस', स्टँड-अप कॉमेडिअन रसेलने व्यक्त केला राग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आमिर खान आणि रसेल पीटर्स)
मुंबई- आमिर खानने अलीकडेच एका कार्यक्रमात एआयबी रोस्टमध्ये सामील झालेला निर्माता करण जोहरसह अभिनेता अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह यांची शाळा घेतली होती. मात्र आमिरच्या या टिकेने नाराज झालेल्या भारतीय वंशाचा लोकप्रिय कॅनडिअन स्टँड-अप विनोदवीर रसेल पीटर्सने आमिरला गप्प बसण्याचा सल्ला दिला आहे. तो एक प्रसिध्द विनोदवीर आहे. त्याने आमिरवर तिव्र टिका केली आहे.
रसेलला याविषयी विचारण्यात आले असता त्याने खळबळजनक उत्तर दिले, 'रोस्ट हिंसक आहे आणि याच्याशी जोडलेले लोक या प्रकरणात जबाबदार आहेत, हे सांगणारा आमिर कोण आहे? त्याने अद्याप रोस्ट पाहिले देखील नाहीये. कुणीतरी त्याला सांगा गप्प बस.'
'सोर्स कोड'सारख्या हॉलिवूड सिनेमांत दिसलेला 44 वर्षीय रसेलने सांगितले, 'हे काय समजतात, हे मला माहित नाही. रोस्ट एक असा शो आहे, ज्यामध्ये विनोदाला वाईट पध्दतीने सादर केले जाते. मात्र यात कुणी मागे टिका करत नाही, जे आहे ते समोर बोलले जाते.'