आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

AIB व्हिडिओ: रणवीर आणि अर्जुनवर वाढला माफी मागण्याचा दबाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्लूआयसीई)ने एआयबी नॉकआऊट शोमध्ये सहभागी होणारा अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर आणि करन जोहर यांना माफी मागण्यास सांगितले आहे. संघटनेने सांगितले, की आपत्तीजनक व्हिडिओमध्ये दिसणा-या तिन्ही व्यक्तींनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
एफडब्लूआयसीई या संघटनेत फिल्म इंडस्ट्रीसह इतर क्षेत्रातील दिग्गज सामील आहेत.
करण जोहरने यावर सांगितले होते, की ज्यांना हा शो पसंत नाहीये, त्यांनी तो पाहू नये. प्रसिध्द दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी करण जोहरला समर्थन दिले होते. यादरम्यान एआयबीने हा वादग्रस्त व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकला.
यापूर्वी बॉलिवूड स्टार सलमान खाननेसुध्दा एआयबीच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांनी खिल्ली उडवल्याने आक्षेप घेतला होता. या कार्यक्रमात सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिची खिल्ली उडवण्यात आली. लग्नापूर्वी अर्पिताचे अभिनेता अर्जुन कपूरसोबत काही काळ अफेअर होते. त्यामुळे यावेळी करण जोहर, रणवीर सिंहने तिला निशाण्यावर घेतले होते.
बहिणीची खिल्ली उडवण्यात आल्याने सलमान चांगलाच भडकला. त्याने एआयबीच्या आयोजकांना व्हिडिओ काढण्याची ताकिद दिली होती. नंतर हा व्हिडिओ काढून टाकण्यात आला. सेन्सॉर बोर्डानेसुध्दा या शोवर आक्षेप घेतल्याचे सांगितले जाते.
मनसेने दिला होता शो बंद करण्याचा इशारा-
नॉकआऊट या शोच्या अश्लिल वक्तव्यामुळे मनसेने एआयबी हा शो महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या विरोधात आहे त्यामुळे हा बंद करावा, असा इशारा दिला होता. तसेच ज्या कलाकारांनी यात भाग घेतला आहे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा या कलाकारांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशा इशारा मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला होता.
एआयबी दबावाला दिला नकार-
सोशल साइटवर दिलेल्या स्पष्टीकरणात एआयबीने सांगितले, की एखाद्या व्यक्तीच्या दबावाखाली व्हिडिओ हटवण्यात आलेला नाहीये. हा व्हिडिओ एखादा धमकीचा फोन किंवा पक्षांचे कार्यकर्ते अंदोलन करतील म्हणूनदेखील काढण्यात आलेला नाहीये. हा व्हिडिओ आम्ही स्वत: काढला आहे.
काहीतरी नावीन्य आणण्यासाठी उडवली जाते खिल्ली-
एआयबीचे म्हणणे आहे, की जे लोक आम्हाला फॉलो करतात, त्यांना ठाऊक आहे आम्ही कशाप्रकरचा कंटेन्ट टाकतो. आम्ही कंटेन्टमध्ये नवीन प्रयोग करत असतो, त्यामुळे नॉकआऊटमध्ये रोस्ट फॉर्मेट आणला होता. जेणेकरून सेलिब्रिटींना स्वत:वर हसण्याची संधी मिळावी. त्यामुळे जे स्वत:ची खिल्ली उडवू शकतील आणि जे अॅडल्ट टाइपचे प्रश्न विचारू शकतील अशा लोकांना आम्ही आमंत्रित केले होते. त्यांचे प्रश्न जरी मुर्खपणाचे असले तरी ते चांगल्या हेतूने विचारण्यात आले होते.
कुणावर शो पाहण्यासाठी केला नाही दबाव-
स्पष्टीकरणामध्ये सांगितले, की जे व्हिडिओ प्रसारित केले जात आहे, ते डिसक्लेमरसोबत येत आहेत. त्यामध्ये विशिष्ट वयाच्या लोकांनी पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एआयबीचे म्हणणे आहे, की हा शो पाहण्यासाठी कुणाला दबाव टाकण्यात आलेला नाहीये. जगभरातील प्रत्येक चॅनलवर हा शो प्रसारित केला जाणार नाहीये, ज्या चॅनलवर प्रसारित केला जाणार आहे, त्याचे अधिकार आम्ही खरेदी केले आहेत. यूट्यूबवर हा व्हिडिओ 8 मिलियन लोकांनी पाहिले आहे, हा काही दबाव नव्हता. याला लाइक करणा-यांची संख्यासुध्दा नापसंत करणा-यांपेक्षा जास्त आहे. फॉर्मेट जूनाच इंटरनॅशनल रोस्टचा आहे. नॉकआऊटच्या माध्यमातून आम्ही मुर्खपणाने देशातील कॉमेडीला एका वेगळ्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सरकारच्या कारवाईवर काय म्हणणे आहे एआयबीचे...