मुंबई: ऐश्वर्या राय बच्चन रविवारी (9 नोव्हेंबर) मुलगी आराध्या बच्चनसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज रायसुध्दा दिसले. विशेष म्हणजे, आराध्या आई आणि आजोबांचा हात पकडून चालताना दिसली. यावेळी अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनीसुध्दा दिसल्या.
आराध्याला अनेकदा आई ऐश्वर्याच्या कुशीत पाहिले आहे. मात्र, यावेळी आराध्या पायी चालताना दिसली. आराध्याने पांढ-या रंगाचा फ्रॉक, गुलाबी स्वेटर आणि ब्लॅक लेगिंग्स परिधान केलेली होती. ती आई आणि आजोबासोबत हात पकडून चालत होती. ऐश्वर्यासुध्दा यानेळी खूप प्रसन्न दिसून आली. आराध्या पहिल्यांदा कान्स फेस्टिव्हलमध्ये पायी चालताना दिसली होती. याच महिन्याच्या 16 तारखेला आराध्या तीन वर्षांची होणार आहे.
हेमा मालिनीसुध्दा दिसल्या
मुंबई एअरपोर्टवर अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनीसुध्दा दिसल्या. त्यांनी रेड-ब्लॅक रंगाचा सूट परिधान केलेला होता. हेमा यावेळी
मोबाइलमध्ये बिझी दिसल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आराध्या आणि हेमा मालिनी यांची छायाचित्रे...