मुंबईः 'शमिताभ' या आगामी हिंदी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटात पार पडला. ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. येथे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती
अभिषेक बच्चनसोबत पोहोचली होती. या सिनेमात
अमिताभ बच्चन, धनुष आणि कमल हासन यांची लेक अक्षरा हासन यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या इव्हेंटमध्ये ऐश्वर्याने संदीप खोसला-अबू जानी यांनी डिझाइन केलेला गडद पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला होता. येथे ऐश्वर्याने गुलजार, धनुषसह अनेक सेलिब्रिटींची भेट घेतली. शिवाय अभिषेक आणि
अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्टेजसुद्धा शेअर केला. आर. बाल्की शमिताभचे दिग्दर्शक असून येत्या 6 फेब्रुवारी सिनेमा रिलीज होणार आहे.
जेव्हा 'रोबोट'च्या हीरोसोबत झाली ऐश्वर्याची भेट...
या सोहळ्यात दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत सहभागी झाले होते. ऐश्वर्याने रजनीकांतसोबत 'रोबोट' या सिनेमात काम केले होते. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या कार्यक्रमात ऐश्वर्याने आवर्जुन रजनीकांत यांची भेट घेतली. 'शमिताभ' या सिनेमात रजनीकांत यांचे जावई धनुष महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या ऐश्वर्या राय बच्चनची खास झलक...