आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya And Abhishek Bachchan Host The AmfAR Dinner At Cannes 2014

CANNESमध्ये ऐश्वर्यासह amfAR डिनरमध्ये सहभागी झाला अभिषेक, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेले तीन दिवस कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला जलवा दाखवणा-या ऐश्वर्या राय बच्चनला गुरुवारी तिचा पती अभिषेक बच्चनची साथ लाभली. अभिषेक येथे amfAR डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. ऐश्वर्या तिस-या दिवशी क्रिम कलरच्या गाऊनमध्ये दिसली. या गाऊनसोबत तिने चोपार्ड ब्रॅण्डचे दागिने घातले होते. तर अभिषेक बच्चनचा देसी लूक येथे पाहायला मिळाला. त्याने बंद गळ्याची शेरवानी परिधान केली होती.
amfAR डिनरमध्ये काही निवडक पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. यावेळी लिलावातून चॅरिटीसाठी पैसे गोळा केले जातात. एड्स रुग्णांसाठी हा पैसा गोळा केला जातो. यावर्षी अभिषेक आणि ऐश्वर्या या डिनर पार्टीचे खास पाहुणे होते. संध्याकाळी या कार्यक्रमाची सुरुवात शॅम्पेन रिसेप्शनने झाली. त्यानंतर डिनर, लिलाव, फॅशन शो आणि डान्स परफॉर्मन्स रंगले. मध्यरात्री रंगणा-या 'आफ्टर पार्टी'ची सर्वांनाचा उत्सुकता असते.
यावर्षीचा कानमधील ऐश्वर्याचा हा तिसरा अपिअरन्स होता. सर्वात पहिल्यांदा रॉबर्टा कॅव्हॅली गोल्डन गाऊनमध्ये ती रेड कार्पेटवर अवतरली होती. तर दुस-या दिवशी रॉबर्टा कॅव्हॅलीच्या सिल्व्हर गाऊनमध्ये ऐश्वर्याची जादू बघायला मिळाली.
अभिषेक सध्या त्याच्या आगामी ऑल इज वेल या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. मात्र त्याने आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत कानमध्ये हजेरी लावली. अभिषेक गुरुवारी फ्रान्समध्ये दाखल झाला. आराध्यासुद्धा ऐश्वर्यासोबत फ्रान्समध्येच आहे. आपल्या कुटुंबाला भेटल्यानंतर अभिषेकने ट्विट केले, ''तुम्ही कितीही थकले असाल, मात्र आपल्या कुटुंबाला भेटल्यानंतर आणि त्यांना अलिंगन दिल्यानंतर तुमचा सर्व थकवा निघून जातो.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अभिषेक आणि ऐश्वर्याचा ग्लॅमरस लूक...