OMG! अभिषेक / OMG! अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये 'सामना' रंगणार

दिव्य मराठी नेटवर्क

Feb 11,2015 04:43:00 AM IST

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन फिल्मी पार्टी, समारंभ, जाहीर कार्यक्रम, स्टेज शोद्वारे नेहमीच चर्चेत असतात. या दोघांना एकत्र काम करताना पाहणे त्यांच्या चाहत्यांनाही आवडते. मात्र, या जोडप्यात आता 'सामना' रंगणार असून दोघे लवकरच एकमेकांच्या समोर उभे ठाकणार आहेत. अर्थात त्यांचे हे 'आमने सामने' रुपेरी पडद्यावरील असून दोघांच्या प्रमुख भूमिका असलेले दोन वेगवेगळे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
ऐश्वर्या "जज्बा' या आगामी चित्रपटातून "कमबॅक' करणार आहे. तसेच करण जोहरच्या "ये दिल है मुश्कील' या चित्रपटातही ती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जून रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चन याचा 'हाऊसफुल्ल' हा नवा चित्रपटही आता अंतिम टप्प्यात असून हा चित्रपटही जून रोजीच प्रदर्शित होणार आहे. साजिद फरहाद दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेकसह अक्षयकुमार, रितेश देशमुख हे कलाकार आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांचेही नवे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने रुपेरी पडद्यावर या दोघांचा सामना रंगणार आहे.
X
COMMENT

Recommended News