आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai And Abhishek Bachchan\'s Daughter Aaradhya Turns Three Today

B\'Day: अभि-ऐशची लाडकी लेक आराध्या झाली तीन वर्षांची, पाहा कसा बदलत गेला चेहरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आराध्याची आईवडील आणि आजीआजोबांसोबतची छायाचित्रे)

मुंबईः बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची लाडकी नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची लेक आराध्या आज तीन वर्षांची झाली आहे. 16 नोव्हेंबर 2011 रोजी माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या पोटी आराध्याचा जन्म झाला. अभिषेकने आराध्याच्या जन्माची बातमी ट्विटरवर देताना म्हटले होते, 'इट्स अ गर्ल !'. ही बातमी येताच बच्चन कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता. आराध्याच्या जन्मानंतर तिची एक झलक बघण्यासाठी बच्चन कुटुंबीयांचे चाहते खूप आतुर झाले होते. मात्र बच्चन कुटुंबीयांनी अनेक दिवस आराध्याला कॅमे-यापासून लांब ठेवले होते. बिग बींच्या सत्तराव्या वाढदिवशी आराध्याची पहिली झलक बघायला मिळाली होती. तेव्हापासून आराध्या आपल्या आईबरोबर सार्वजनिक ठिकाणी नेहमी दिसत असते. विशेष म्हणजे अमिताभ आणि अभिषेक सोबत असतानादेखील आराध्या ऐश्वर्याच्याच कडेवर दिसते. आपल्या आईसह तिने अनेकदा परदेशवारीदेखील केली आहे.
आराध्या बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी किड ठरली आहे. आराध्या खूप हुशार असून एवढ्या कमी वयातच तिला गायत्री मंत्र तोंडपाठ असून आयपॅड वापरता येतो. ती आयपॅडवर आपल्या आवडीची गाणी ऐकत असते. हे स्वतः बिग बींनी आपल्या ब्लॉगवर सांगितले होते. आराध्या आता शाळेत जाऊ लागली आहे. मागील वर्षी कान फिल्म फेस्टिव्हमध्ये ऐश्वर्या आराध्याला सोबत घेऊन गेली होती.
आराध्याचा यंदाचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी ऐश्वर्याने भरपूर प्लानिंग केले आहे. आराध्या एक वर्षाची झाली तेव्हा काही जवळचे मित्र आणि कौटुंबिक सदस्यांना तिच्या वाढदिवशी आमंत्रित करण्यात आले होते, तर दुस-या वाढदिवसाला बच्चन कुटुंबीयांनी मोठे सेलिब्रेशन केले आणि लहान मुलांना वाढदिवसासाठी आमंत्रित केले होते. यावेळी दोन्हींच्या मिश्रणाचा विचार ऐश्वर्याने केला आहे. अर्थात आज बच्चन कुटुंबात जंगी पार्टी होईल असे दिसते.
आज आराध्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला तीन वर्षांत तिच्या चेह-यात झालेला बदल छायाचित्रांमधून दाखवत आहोत. माध्यमांमधील अगदी पहिल्या क्लिकपासून ते आत्तापर्यंतची आराध्याची छायाचित्रे तुम्हाला या पॅकेजमध्ये बघता येणार आहेत.
आमच्याकडून आराध्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढे क्लिक करा आणि बघा अभि-ऐशच्या क्युट परीची खास छायाचित्रे....