आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Aishwarya Rai Bachchan Rare Childhood Pictures

B'day: 41 वर्षांची झाली ऐश्वर्या, पाहा तिची बघितलेली आणि न बघितलेली निवडक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ऐश्वर्याची छायाचित्रे... )

बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्वर्याने आपल्या सौंदर्य आणि मेहनतीच्या बळावर इंडस्ट्रीत यशोशिखर गाठले आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी कर्नाटक येथील मंगळूरुमध्ये जन्मलेल्या ऐश्वर्याने वयाच्या 21 व्या वर्षी जगतसुंदरीचा खिताब आपल्या नावी केला. हा मान मिळवल्यानंतर तीन वर्षांनी तिने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. तिचा सुरु झालेला हा प्रवास आजतागायत सुरु आहे. मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने काही दिवस इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. मात्र पुढील वर्षी 'जज्बा' या सिनेमाद्वारे ती मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
ऐश्वर्या बालपणापासूनच आपल्या आईवडिलांची लाडकी आहे. तिला एक भाऊ असून त्याचे नाव आदित्य राय आहे.
ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला खास तिची खास छायाचित्रे दाखवत आहोत. यामध्ये तिच्या बालपणीच्या छायाचित्रांचा समावेश आहे.
ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...