आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Launches LifeCell's Public Stem Cell Bank In Chennai

Event: ट्रेडिशनल लूकमध्ये अवतरली ऐश्वर्या, पाहा 9 Different Expressions

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लाईफसेल्स पब्लिक स्टेमसेल बँकच्या कार्यक्रमात ऐश्वर्या राय बच्चन)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच चेन्नईत आयोजित लाईफसेल्स पब्लिक स्टेमसेल बँकच्या ओपनिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. ऐश्वर्या लाईफसेलची गुडविल अॅम्बेसेडर आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐश्वर्याने लाईफसेलसोबत करार साइन केला होता.
या ओपनिंग इव्हेंटमध्ये ऐश्वर्या ट्रेडिशनल लूकमध्ये खूप आकर्षक दिसली. तिने रेड कलरची साडी नेसली होती. शिवाय हातात आणि कानात साडीला शोभून दिसणारी ज्वेलरी घातली होती. गळ्यात मात्र तिने कोणतीही ज्वेलरी घातली नव्हती.
सध्या ऐश्वर्या तिचा हबी अभिषेक बच्चनसह प्रो-कबड्डी लीगमध्ये बिझी आहे. या लीगमध्ये अभिषेकची टीम जयपूर पिंक पँथर सहभागी झाली आहे.
बातमी आहे, की ऐश्वर्या लवकरच दिग्दर्शक संजय गुप्तांच्या 'जज्बा' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये कमबॅक करणार आहे. या सिनेमात तिच्यासह अभिनेता जॉन अब्राहम झळकणार असल्याची चर्चा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटमध्ये क्लिक झालेली ऐश्वर्याची ट्रेडिशनल लूकची खास छायाचित्रे...