मुंबई: माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने काल (1 नोव्हेंबर) माध्यमांसोबत
आपला 41वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ती ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. तिने माध्यमांसोबत आगामी 'जज्बा' सिनेमाविषयी बातचीत केली.
ऐश्वर्याने केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी ऐश्वर्याकडे सेलिब्रेशनसाठी अनेक निमित्त होते. पहिले म्हणजे,
अभिषेक बच्चनचा 'हॅपी न्यू इअर' सुपरहिट ठरला, तसेच ती स्वत: 'जज्बा' सिनेमातून कमबक करत आहे. ऐकिवात आले आहे, की ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त 'जज्बा' दिग्दर्शक संजय गुप्ताने तिच्यासाठी एक प्रीमेच्योर टीजर तयार केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा माध्यमांसोबत ऐश्वर्याने साजरा केलेल्या वाढदिवसांची छायाचित्रे...