आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनरागमनासाठी ऐश्वर्या बच्चनचे 'वेट अँड वॉच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चनच्या रुपेरी पडद्यावरील पुनरागमनाला ग्रहण लागले आहे. हिंदी चित्रपटांच्या अनेक पटकथांना नाकारल्यानंतर प्रल्हाद कक्कडसोबत 'हॅप्पी अँनिव्हर्सरी' चित्रपटात ऐश्वर्या तिचा पती अभिषेक बच्चनसोबत पडद्यावर दिसणार होती. मात्र, यात बच्चन दांपत्य काम करणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. याशिवाय मणिरत्नमच्या तेलगू अॅक्शन चित्रपटाद्वारे ऐश्वर्याचे पुनरागमन होणार होते. आता मात्र या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.
चित्रपटात ऐश्वर्यासोबत महेश बाबूची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाची शूटिंग जूनपासून सुरू होणार होती. मात्र, महेशच्या एका अन्य चित्रपटाचे शूटिंग पुढे ढकलण्यात आल्याने ऐश्वर्यासोबतच्या चित्रपटावर त्याचा परिंणाम झाला आहे. कारण या चित्रपटाचे शूटिंग एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी महेश बाबू आपले बाकीचे प्रोजेक्ट पूर्ण करून हा चित्रपट सुरू करू इच्छित आहे. सूत्रानुसार, चित्रपट आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फ्लोअरवर येईल. चित्रपटाचे बहुतांश शूटिंग परदेशात होणार आहे. त्यामुळे मणिरत्नम यांनी शूटिंग पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.